बीड/प्रतिनिधी:=धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन,सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांचे मानवी तत्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी बीड जिल्ह्यात ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे. प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीडच्या वतीने ही परिषद गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी महाविहार धम्मभूमी, शिवणी (ता. जि. बीड) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.संस्थेचे सचिव तथा परिषदेचे मुख्य संयोजक भिक्खु धम्मशील थेरो यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रा. प्रदिप रोडे, भास्कर सरपते, इंजि. वसंत तरकसे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन केले, त्या घटनेला ६९ वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगाने ही परिषद भरविण्यात येत आहे.कार्यक्रमाचे स्वरूप:सकाळी ८ वाजता: बीड शहरातील सामाजिक न्याय भवनपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात येईल.सकाळी १० ते १२: शिवणी येथील धम्मपरिषदेच्या ठिकाणी प्रा. दिपक जमदाडे यांचा भीम व बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.प्रमुख कार्यक्रम: दिवसभर भिक्खुंच्या धम्मदेसनेतून (धम्म उपदेश) उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करण्यात येईल.मान्यवरांची उपस्थिती:या धम्मपरिषदेला भदंत डॉ. इंदवंस्स महाथेरो (अध्यक्ष), भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो (उदघाटक), भिक्खु उपगुप्त महाथेरो, भिक्खु पय्यातीस महाथेरो (प्रमुख धम्मदेसना) यांच्यासह अनेक पूज्य भिक्खुंची उपस्थिती असणार आहे. यासोबतच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसपी नवनीत कॉवत, प्र कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, आयुक्त प्रदिप भोगले आणि गोल्डमॅन डॉ. रोहित पिसाळ यांसारखे प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहतील.उपस्थितांसाठी विशेष सोय:मोफत बससेवा: बौद्ध उपासक-उपासिकांसाठी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवणी आणि बार्शी नाका चौक ते शिवणी अशी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
भोजनदान: दरवर्षीप्रमाणे नालंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे यांच्याकडून भोजनदान दिले जाणार आहे.भिक्खु धम्मशील थेरो यांनी बौद्ध उपासक-उपासिका आणि आंबेडकरी जनतेला या ऐतिहासिक धम्मपरिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.













