पोलिस प्रशासन न्यूज.

​मी आंबेडकरी; RSS च्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही: सरन्यायाधीश गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण


अमरावती:=आरएसएस’चे षडयंत्र! निमंत्रण स्वीकारलेले नाही; प्रकाशित झालेली बातमी खोटी असल्याचा कमलताई गवई यांचा दावा.​सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अमरावती येथील विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताचा तीव्र शब्दांत निषेध करत ते वृत्त धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील एक पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध करत, आपण आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक असून, संघाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.”आरएसएसचे हे षडयंत्र आहे”येत्या ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील श्रीमती नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणावर आरएसएसचा विजयादशमी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कमलताई गवई या या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी असणार असल्याची बातमी प्रसारित झाली होती. मात्र, यावर त्वरित प्रतिक्रिया देत कमलताई गवई यांनी ही बातमी खोटी असल्याचे नमूद केले.पत्रात त्यांनी म्हटले आहे, “मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही. आरएसएसचे हे षडयंत्र आहे. मी सदरहू निमंत्रण स्वीकृत करीत नाहीं.””संविधानाप्रती निष्ठा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व” कमलताई गवई यांनी त्यांच्या भूमिकेचे कारण स्पष्ट करताना आंबेडकरी विचार आणि संविधानाप्रती असलेली आपल्या घराण्याची अविरत निष्ठा अधोरेखित केली आहे. ‘दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष’ म्हणून त्यांची सामाजिक जाणीव कुठल्याही प्रकारे दुःखी होऊ देणार नाही.पत्रात त्या पुढे म्हणतात, “विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली, तरी आम्हाकरीता धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे.”यापूर्वी कमलताई गवई यांचे पती आणि माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. डॉ. गवई हे बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते आणि दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या वारशाचा उल्लेख करत कमलताई गवई यांनी तमाम आंबेडकरी जनतेने अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!