पोलिस प्रशासन न्यूज.

सुखापूरी नदिपुलाचे काम ठप्प; वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष!


सुखापूरी (रामकिसन अवधूत) प्रतिनिधी: सुखापूरी नदिवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी सध्या ते पूर्णपणे ठप्प झाले आहे. या कामामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सततच्या पावसामुळे पुलाचे काम काही काळ थांबले होते, मात्र गेल्या आठवड्यापासून हवामान खुलले असूनही ठेकेदाराने काम पुन्हा सुरू केलेले नाही. नागरिकांनी ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो फोन उचलत नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोनदेखील नॉट रिचेबल असल्याचे समजते.या कामातील विलंबामुळे लखमापूरी आणि सुखापूरी गावातील नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः मोठ्या वाहनचालकांना पुल ओलांडताना मोठा त्रास होत आहे. गावकऱ्यांना पायी ये-जा करतानाही कसरत करावी लागत आहे. पुलावरील कठडे बसवायचे अजून बाकी असून, दोन्ही बाजूंनी मुरूम टाकून भराव करण्याची तातडीची गरज आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास दोन्ही गावातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे .


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!