पोलिस प्रशासन न्यूज.

कणा-कणाने ज्ञान मिळवून शील-सदाचाराने कर्तुत्ववान बना’: पी. व्ही. बनसोडे


बीड (प्रतिनिधी): ज्ञानप्राप्ती, शील-सदाचार आणि ध्येयनिष्ठ कर्तृत्व या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन से.नी. सी.ई.ओ (जी.प.) पी. व्ही. बनसोडे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप संचलित चौथ्या मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटन आम्रपाली बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (पूरग्रस्त कॉलनी) येथे संपन्न झाले, यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करत होते.​बनसोडे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश.बनसोडे यांनी मधमाशीचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना सांगितले की, ज्याप्रमाणे मधमाशी कणा-कणाने मध गोळा करते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही विद्यार्थी दशेत एक क्षणही वाया न घालवता, पालक, गुरुजन, निसर्ग आणि पुस्तकांच्या सहवासातून कणा-कणाने ज्ञान प्राप्त करावे.​ज्ञानप्राप्तीसोबतच शील व सदाचाराची जोड आवश्यक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रमाता जिजाऊंसह सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनिष्ट रूढी व अंधश्रद्धांच्या आहारी न जाता, ज्ञानसंपन्न व गुणसंपन्न बनावे. त्यांनी मुलांना ध्येय निश्चित करून उच्च पद प्राप्त करण्याचे आणि स्व:उन्नतीसोबतच समाजसेवा व देशसेवा करण्याचे आवाहन केले.​पालकांना मार्गदर्शन: मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी पालकांनी स्वतः प्रज्ञा, शील, करुणा व सदाचाराच्या मार्गाने आदर्श जीवन जगावे, कारण लहान बालके मोठ्यांच्या वागण्याचे अनुकरण करतात.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा प्रबंधक एल.आय.सी. यु.एस. वाघमारे व एस.एस. सोनवणे यांच्या हस्ते झाले.​प्रशांत वासनिक यांनी कोळशाच्या खाणीतील मौल्यवान हिऱ्याचे उदाहरण दिले. हिरा प्राप्त करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, तसेच विद्यार्थ्यांनी महापुरुषांनी केलेल्या संघर्षाचा आदर्श ठेवून अठरा-अठरा तास अभ्यास केल्यास ज्ञानाच्या जोरावर उच्च पद मिळवता येईल, असे स्पष्ट केले.​कॅप्टन आठवले यांनी एका अंध मुलीच्या कलेक्टर बनण्याच्या प्रेरणादायक घटनेची आठवण करून देत, उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली.​​यावेळी मोफत शिकवणी वर्गाच्या शिक्षिका रिंकल टेकाळे ताई आणि आयु रेखा गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. ०६ डिसेंबर २०२४ रोजी मिळालेल्या दान साहित्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही, पेन) व खाऊचे वाटप करण्यात आले.​महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले सर, समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ, बप्पा जावळे, के.एस. वाघमारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रा. अशोक गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. “वाचाल तर वाचाल” चे अध्यक्ष डी.जी. वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व बहुसंख्य विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!