केज/प्रतिनिधी: परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने केज येथील पत्रकार धनंजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी संपन्न झाले. या प्रसंगी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच दिनदर्शिकेद्वारे सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पुरोहित कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास केजकर,पुरोहित कल्याण समितीचे मराठवाडा अध्यक्ष अनंत कोकीळ, समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी,प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर खोत, मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच प्रल्हाद देव यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. दिनदर्शिकेच्या माध्यमा तून समाजातील उपक्रम, सण-उत्सव व मार्गदर्शक माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













