पोलिस प्रशासन न्यूज.

छत्रपती मल्टीस्टेट घोटाळा: बळी पडलेल्या सुरेश जाधवांच्या न्यायासाठी पत्नी कविता जाधव यांचे पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण


प्रतिनिधी(​रामकिसन अवधूत).संभाजीनगर: छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात येऊन आत्महत्या केलेल्या सुरेश जाधव यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांची पत्नी कविता जाधव आणि आई यांनी दिनांक २९ सप्टेंबर पासून छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले आहे.    बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील रहिवासी असलेल्या सुरेश जाधव यांनी मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या बँकेच्या घोटाळ्यामुळे जीव गमावला. या फसवणुकीतील संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा, यासाठी कविता जाधव यांनी ठाम भूमिका घेतली आहे.चार महिन्यांपासून गुन्हा दाखल नाही.कविता जाधव यांनी चार महिन्यांपूर्वी गेवराई पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही तसेच आरोपींना अटकही झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या कविता जाधव या आपल्या सासू व लहान मुलांसह न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसल्या आहेत. ​”आमचा पैसा आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नकार्यासाठी साठवला होता, पण या बँकेने गोरगरिबांच्या पैशावर डल्ला मारला आहे. आता न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा निर्धार कविता जाधव यांनी व्यक्त केला.कविता जाधव यांच्या या लढ्याला स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय नेत्यांचे समर्थन मिळत आहे. शासनाने लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेऊन ठेवीदारांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!