पोलिस प्रशासन न्यूज.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा ‘विराट धडक मोर्चा’ यशस्वी; SRA प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!


पुणे :  पुण्यात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे झोपडीवासीयांना मोठा दिलासा; प्रकल्पग्रस्तांना ₹१५,००० घरभाडे मिळणार.महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात काढलेला ‘विराट धडक मोर्चा’ ऐतिहासिकरीत्या यशस्वी ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मांडलेल्या झोपडीवासीयांच्या सर्व प्रमुख मागण्या एसआरए प्रशासनाने तातडीने मान्य केल्या आहेत.ॲड. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे यश. SRA च्या गैरकारभार आणि बिल्डरधार्जिण्या धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच झोपडीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः या आंदोलनाची धुरा सांभाळली आणि S.R.A. कार्यालय, पुणे येथे प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत झोपडीवासीयांचे हक्क जोरदारपणे मांडले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने मागण्या मान्य कराव्या लागल्या. प्रशासनाने मान्य केलेल्या महत्त्वाच्या मागण्या.ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी SRA कार्यालयासमोर नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी पुढील महत्त्वाच्या मागण्या जोरदारपणे मांडल्या, ज्या प्रशासनाने तत्काळ मान्य केल्या: १). प्रकल्प नियम त्वरित लागू: पिंपरी-चिंचवडमधील जे प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेले आहेत, त्यांना SRA चे नियम त्वरित लागू करण्यात यावेत. २). घरभाडे वाढ: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात SRA प्रकल्पग्रस्तांना दरमहा पंधरा हजार रुपये घरभाडे देण्यात यावे.३). अपात्रता थांबवा: चुकीच्या धोरणांमुळे नागरिकांना अपात्र ठरवण्याचे काम तातडीने थांबवावे. या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्यामुळे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील हा विराट धडक मोर्चा यशस्वी ठरला आहे. या यशाबद्दल पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील SRA बाधित लोकांनी त्यांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहेत.


58
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!