रामकिसन अवधूत (जालना प्रतिनिधी ) : अंबड तालुक्यातील कुक्कडगाव उत्तर येथे गुणात्मक शिक्षण व शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीच्या उद्देशाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) उत्साहात पार पडली.
परिषदेचे उद्घाटन पंचायत समिती अंबडच्या गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडेदेवी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी श्री. रवी कवडे उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिनगारे, गोविंद चव्हाण, केंद्रप्रमुख भाऊसाहेब पावशे व केंद्रीय मुख्याध्यापक अमोल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
परिषदेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक अध्यापन पद्धती व सर्वांगीण विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुक्कडगाव उत्तर, दक्षिण व तांडा परिसरातील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












