पोलिस प्रशासन न्यूज.

धनगर पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी


जालना.(रामकिसन अवधूत) प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी १० वाजता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याचे स्मरण केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली असून, त्यांच्या विचारांचा आजही समाजाला मार्गदर्शक ठरणारा वारसा आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. महेश लंगोटे, आरोग्य निरीक्षक आर. एम. ताकट, श्री. सी. ए. वाढे, नवले साहेब, अंजली ताई खरात, ज्ञानेश्वर बहुले, संदिप जावळे, पी. व्ही. गंगाधरे, कातखेडे सिस्टर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!