पोलिस प्रशासन न्यूज.

केज येथे ‘वर्षावास २०२६’ अंतर्गत ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेचे दिमाखात उद्घाटन ​आयू. जयपाल मस्के यांचे “प्रत्येक नगरात वर्षावास सुरू करा” असे आवाहन


केज (प्रतिनिधी) :

भारतीय बौद्ध महासभा, केज च्या वतीने आयोजित ‘वर्षावास २०२६’ अंतर्गत ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेच्या उद्घाटन सोहळ्याचे अतिशय भव्य, उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजन करण्यात आले. हा सोहळा बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता वेळूवन बुद्ध विहार, भीमनगर (केज) येथे पार पडला.

​आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत बौद्ध धम्मात वर्षावासाचे व्रत पाळले जाते. या पवित्र कालावधीत युगप्रवर्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या अमूल्य ग्रंथाचे वाचन केले जाते. याच औचित्याने केज येथे या विशेष ग्रंथवाचन व धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून, या मालिकेतील पहिला विषय ‘विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध’ हा होता. सोहळ्याची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून तसेच त्रिशरण-पंचशील ग्रहण करून करण्यात आली.

​धम्म प्रवचनाची आजच्या काळात खरी गरज : मा. अरुण पटेकर

​या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा (पूर्व) चे संघटक मा. अरुण पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आषाढ पौर्णिमेचे तथागत बुद्धांच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व विस्तृतपणे विशद केले. तसेच वर्षावासाचे महत्त्व, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाची थोरवी आणि आजच्या आधुनिक काळात धम्म विचारांची असणारी निकड यावर सविस्तर प्रकाश टाकला.

​प्रत्येक नगरात वर्षावास सुरू व्हावा : आयू. जयपाल मस्के

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भारतीय बौद्ध महासभा केज चे शहराध्यक्ष आयू. जयपाल मस्के यांनी सर्वांना आषाढ पौर्णिमा व वर्षावासानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “शहरातील प्रत्येक नगरात वर्षावास सुरू करून धम्म कार्य तळागाळापर्यंत पुढे न्यावे,” असे कळकळीचे आवाहन केले. तसेच शहरातील सर्व बौद्ध बंधू-भगिनींनी या संपूर्ण धम्म प्रवचन मालिकेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

​महिला उपासिकांची लक्षणीय उपस्थिती व नवपदाधिकाऱ्यांचा सत्कार

​कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला उपासिकांची झालेली प्रचंड उपस्थिती!

​महिला तालुका शाखेतर्फे: महानंदा गायकवाड, मीरा खरात, प्रमिला मस्के, बबिता मस्के, संगीता साळवे, कौशल्या मस्के यांची हजेरी होती.

​महिला शहर शाखेतर्फे: सुरेखा मस्के, कुसुम मस्के, रत्नमाला मस्के, आशा मस्के, हौसाबाई हजारे, कलावती हजारे, सुनीता हजारे, सावित्राबाई कांबळे, शीतल लोमटे, वर्षा हजारेमैनाबाई मस्के उपस्थित होत्या.

​प्रमुख उपस्थिती व खीरदान

​सोहळ्यास परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत मस्के, महेंद्र मस्के, कल्याण मस्के, डॉ. प्रभाकर ठोकेदीपक मस्के यांचा समावेश होता.

​वर्षावास उद्घाटन सोहळ्यानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव कल्याण मस्के यांच्या परिवाराकडून उपस्थित सर्व बौद्ध बांधव, उपासक-उपासिका आणि बालकांसाठी ‘खीरदान’ करण्यात आले.

​प्रसन्न वातावरणात सांगता

​मुख्याध्यापक आयू. नंदकुमार मस्के यांनी अतिशय नेटके आणि अभ्यासपूर्ण संचलन केले. शेवटी सरनत्त घेऊन तसेच ‘जय भीम’ आणि ‘नमो बुद्धाय’ च्या अभूतपूर्व जयघोषात या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला भीमनगर परिसरातील नागरिकांसह लहान बालक-बालिकांचीही मोठी उपस्थिती लाभली होती.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!