केज/प्रतिनिधी.केज नगरपंचायत मधील पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत ३ कोटी ६२ लाख रुपयांचा महा घोटाळा झाल्याचा गंभीर प्रकार चौकशी समिती कडून उघड झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणा तील अधिकारी पदाधिकारी यांसह सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केज नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केली आहे.
गोरगरिबांचे घरे गिळंकृत केली गेली.या प्रकरणावर आदित्य पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील दोषी अधिकारी व पदाधिकारी यांचे तात्काळ निलंबन करून अपहार झालेली पूर्ण रक्कन लाभार्थ्यांना
मिळावी.दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी
केज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केली आहे.
पंतप्रधान आवास योजने तून गोरगरिबांना टप्प्या टप्याने आर्थिक सहाय्य देण्यात येते.मात्र केज नगर पंचायतीमध्ये हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी बनावट नोंदी,खोटी कागदपत्रे आणि संगणकीय हेराफेरी करून शेकडो पात्र लाभार्थ्यांना अद्याप संपूर्ण रक्कम मिळालेली नसताना निधी मात्र पूर्णपणे उचलल्याचे उघड झाले आहे.प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गरीब व गरजू नागरिकां साठी देण्यात येणाऱ्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.सदर अहवालात शासकीय निधीचा चुकीचा वापर अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. आमच्या कार्यकाळात गरिबांना घरे उपलब्ध करून दिली.मात्र नंतरच्या काळात असे गंभीर प्रकार घडताहेत ही संतापजनक बाब आहे. या प्रकरणी आदित्य पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, गरीबांच्या घरांसाठी असलेली योजना काही मोजक्या भ्रष्ट लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे.हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, गरिबांच्या हक्कांवरचा घाला आहे.अशा तीव्र संतापजनक भावना आदित्य पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.














