पोलिस प्रशासन न्यूज.

“बुलडाणा अर्बन को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी कडून पत्रकारितेचा सन्मान; केजचे पत्रकार प्रदिप गायकवाड यांचा विशेष सत्कार”


केज.लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी :

बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल केज येथील पत्रकार श्री. प्रदिप गायकवाड यांना विशेष ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.त्या अनुषंगाने जालना येथे सामाजिक क्षेत्रातील पत्रकारितेतील अशा विविध कामांबद्दल गुणगौरव बुलढाणा अर्बन को सोसायटीच्या वतीने आयोजित केला होता

​ एका विशेष कार्यक्रमात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी “बुलडाणा अर्बनला समर्थ साथ…!” अशा शब्दांत गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

​संस्थेचे संस्थापक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

​यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राधेश्यामजी चांडक, विद्यमान अध्यक्ष मा. श्री. डॉ. सुकेशजी झंवर आणि बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा मा. सौ. कोमलताई झंवर , यांनी श्री. गायकवाड यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “बुलडाणा अर्बन आपली सदैव ऋणी राहील,” अशा भावना यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

​विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

​प्रदिप गायकवाड यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केज परिसरातील विविध प्रश्न मांडण्यासोबतच सामाजिक संस्थांच्या कार्याला नेहमीच प्रसिद्धी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्याची नामांकित संस्था असलेल्या बुलडाणा अर्बनने घेतल्याबद्दल पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि केजमधील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!