पोलिस प्रशासन न्यूज.

केज बालाजी मंदिर येथे श्री दासबोध [सामूहिक] पारायण सोहळ्याचे आयोजन,३ फेब्रुवारी रोजी होणार प्रारंभ


केज/प्रतिनिधी: श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्री दासबोध या ग्रंथाच्या पावन स्मरणार्थ केज शहरात श्री दासबोध [सामूहिक] पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा माघ वद्य द्वितीया, मंगळवार दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारंभ होऊन माघ वद्य नवमी,बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी सांगता होणार आहे.

दररोज सकाळी १०-०० ते १-०० या वेळेत पारायण संपन्न होणार असून,सायंकाळी ५-०० वाजता श्रीराम पाठ व रामरक्षा पठण करण्यात येणार आहे.हा धार्मिक कार्यक्रम श्री बालाजी मंदिर,शुक्रवार पेठ,केज येथे आयोजित करण्यात आला आहे.या सामूहिक पारायणात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी श्री. श्रीनिवास गोविंदबुवा केजकर मो.९४०३२९८०८० व सौ.विजया श्रीनिवास केजकर मो. ९८८९१२३४८८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!