पोलिस प्रशासन न्यूज.

घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेबांचा उल्लेख टाळणं. म्हणजे संविधान नाकारन्याची वृत्ती!”


गिरीश महाजन विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक.                                            अ.नगर | प्रतिनिधी

नाशिक येथे दिनांक 26 जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांना तीव्र शब्दांत निवेदन देण्यात आले.

प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा विजयदिन असून त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच देशाची लोकशाही, समानता व सामाजिक न्याय उभा आहे. अशा पवित्र दिवशी बाबासाहेबांचा उल्लेख टाळणे हा दुर्लक्ष करण्याचा प्रकार नसून. तो संविधानाचा अपमान, आणि यातूनच संविधान विरोधी वृत्ती स्पष्ट दिसून येते. आणि यातून महामानवाचा अवमान आणि बहुजन समाजाच्या आत्मसन्मानावर केलेला थेट घाला असल्याचा ठाम आरोप निवेदनातून करण्यात आला.

या कृतीला संविधानविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन, सामाजिक न्याय व्यवस्थेचा अवमान व लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे नमूद करत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तात्काळ निषेध नोंद, जाहीर माफी, प्रशासकीय चौकशी व दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालय स्तरावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

 

सदर निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हामहासचिव तसेच वं.ब.आ. जि. सदस्य सुनिल वाघमारे, यांचे मार्गदर्शना खाली व तालुका अध्यक्ष गौतम चित्ते, यांचे नेतृत्वात देण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थिती मधे तालुका उपाध्यक्ष विशाल पठारे, महासचिव ॲड.अण्णासाहेब मोहन, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, प्रकाश सावंत, सरचिटणीस संतोष बनसोडे यांच्यासह संजय महाले, संतोष त्रिभुवन, सुशील पठारे, तन्वीर मुबारक शेख, किरण झालटे, सिद्धार्थ धनेधर, मनोज शिंदे, सी. एस. बनकर, सलीम शेख, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशाच्या आत्म्याचा अपमान आहे,” अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!