सुखापुरी प्रतिनिधी:
अंबड तालुक्यातील कुक्कडगावमध्ये ११ व्या कीर्तन महोत्सव व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचा आज भक्तिभावात समारोप झाला.गावभर रंगीबेरंगी रांगोळ्या,दीप,फुलं व अगरबत्तीने वातावरण पावन झाले.ह.भ.प.भागवताचार्य स्वाध्वी स्वाती दीदी यांच्या प्रवचनांनी भक्ती,सदाचार व समाजप्रबोधनाचा संदेश दिला. सकाळी ९ ते १० वाजता भव्य दिंडी-मिरवणूक गावातील मुख्य मार्गांवर टाळ-मृदंगाच्या गजरात पार पडली,तर १० ते १२ वाजता महंत महादेव महाराज म.गिरी यांचे कीर्तन झाले.
समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात आला.कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला, तर शिवशक्ती गणेश मंडळ, महिला भजनी मंडळ व ग्रामस्थांनी यशस्वी आयोजनात विशेष मदत केली
.
Views: 139













