पोलिस प्रशासन न्यूज.

केज तालुक्यातील रेशनवरील ज्वारीत किड्यांचा सुळसुळाट; लिंबराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची तहसीलदारांकडे तक्रार.


केज /प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर := ​लाभार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती; तातडीने कार्यवाहीची मागणी.  केज तालुक्यात शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येत असलेल्या अन्नधान्याच्या (ज्वारीच्या) दर्जाबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. वितरित करण्यात येणाऱ्या ज्वारीमध्ये किड, अळ्या आणि जाळे मोठ्या प्रमाणात आढळल्याने वंचित बहुजन आघाडीचे लिंबराज(बापु) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला असून, मा. तहसीलदार साहेब, केज यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ता.प्रवक्ते प्रदिप गायकवाड,सतिश बनसोडे,भारतीय बौद्ध महासभेचे भैय्यासाहेब आरकडे,दत्तात्रय गायकवाड,पांडुरंग जोगदंड,दिनेश शिंदे,व इतर मान्यवरांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे जेष्ट कार्यकर्ते श्री. लिंबराज (बापु) गायकवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केज तालुक्यातील सर्व शिधावाटप (रेशन) दुकानांवर शासनाच्या मंजूर धान्य वितरण योजनेअंतर्गत ज्वारीचे वाटप केले जाते. मात्र, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष धान्याची पाहणी केली असता, वितरित करण्यात आलेल्या धान्यात किड , अळ्या आणि कोळ्याची जाळी मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे.हे धान्य अत्यंत निकृष्ट व अस्वच्छ दर्जाचे असून, अशा प्रकारचे धान्य लाभार्थ्यांना वाटप करणे हे पूर्णपणे गैरप्रकार आहे. या दूषित धान्य वापरामुळे गरीब लाभार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.या संपूर्ण गंभीर प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच लाभार्थ्यांना त्वरित उत्कृष्ट दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. प्रशासनाकडून यावर समाधानकारक उत्तर आणि त्वरित कार्यवाही होईल, अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. पत्राची प्रत मा. जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनाही देण्यात आली आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!