संभाजीनगर (औरंगाबाद): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वंचित बहुजन युवा आघाडीने (VBA) जोरदार सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, पक्षाने प्रभाग क्रमांक ५ मधील आदर्श नगर (गुलाबवाडी) येथे युवा आघाडीच्या नव्या शाखेचे उद्घाटन केले.या नवीन शाखेच्या अध्यक्षपदी किरण सरवदे यांची निवड करून त्यांच्यावर प्रभागातील संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे. या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन युवा आघाडी आता पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांची उपस्थिती .युवक आघाडीच्या या शाखेचे उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. युवक आघाडीचे मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उद्घाटन समारंभाला जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहर उपाध्यक्ष दिनेश नवगिरे, आशुतोष नरवडे, कुणाल गायकवाड, रवींद्र गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, आणि जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडीने स्थानिक पातळीवर सक्रियता वाढविल्यामुळे आता निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.













