पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप: “सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो”


अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सत्ताधारी समाजावर तीव्र निशाणा साधला. “सत्ताधारी समाज हा कायम वंचितांना वंचित ठेवण्यासाठी काम करत असतो,” असे मत त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.    अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे मेळाव्यात आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.                           बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा यावेळी बोलताना अंजलीताईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रबुद्ध भारत करायचा होता. प्रबुद्ध म्हणजे स्वतः प्रबुद्ध होऊन जगण्यात प्रज्ञावंत होणे,” असे त्या म्हणाल्या.    ​’डोळसपणे जगण्याचे’ आवाहन अंजलीताईंनी उपस्थितांना कोणत्याही घटनेकडे डोळसपणे बघितले पाहिजे आणि डोळसपणे जगण्यासाठी आजूबाजूला काय घडत आहे, याचा विचार केला पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन केले. sattadhari aurअकोल्यातील या धम्म मेळाव्याला आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती, आणि अंजलीताईंच्या वक्तव्याने कार्यक्रमाला वैचारिक दिशा मिळाली.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!