पोलिस प्रशासन न्यूज.

आज बीडमध्ये सुजात आंबेडकर ढाका कुटुंबियांची भेट घेणार


बीड(प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका (२२, रा. पेठबीड) या तरुणाचा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता चाकूने खून करण्यात आला. या घटनेत मुख्य आरोपी सूरज काटे याला अटक करण्यात आली असली तरी त्याचे चार ते पाच साथीदार अद्याप मोकाट आहेत.

या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाइक व नागरिकांनी शुक्रवारी (दि. २६) दुपारी जिल्हा रुग्णालयासमोरील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात ठिय्या देत रास्ता रोको केला. तब्बल तासभर झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देत जमावाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मृत तरुण सामान्य कुटुंबातील असल्यानेच पोलिस दखल घेत नाहीत,” असा थेट आरोपही आंदोलनादरम्यान करण्यात आला दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी मा. सुजात दादा आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर ढाका कुटुंबीयांना धीर देण्यासाठी मा. सुजात आंबेडकर हे आज (दि. २९) दुपारी १२ वाजता त्यांच्या घरी येणार आहेत त्यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे उपस्थित राहणार आहेत.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!