पोलिस प्रशासन न्यूज.

*सुखापुरी येथे कृषि विभाग अंतर्गत धरती माता बचाव अभियान संपन्न…*


सुखापुरी ( रामकिसन अवधूत): अंबड तालुक्यातील सुखापूरी येथे 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयमध्ये कृषि विभाग अंबडच्या वतीने गावचे सरपंच (प्रशासक) भगवानराव राखुंडे,ग्राम विकास अधिकारी के. के.कल्याणकर,मा. प. स. स. रईस बागवान,सहाय्यक कृषि अधिकारी एस डी पालवे, व शेतकरी यांच्या उपस्थित *धरती माता बचाव समिती* स्थापन करण्यात आली…. यावेळी प्रभारी मंडळ कृषि अधिकारी सुनील पालवे यांनी धरती माता बचाव अभियानाचे महत्व सांगताना शेतीमध्ये येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा, जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे आवाहन केले,तसेच मृदा आरोग्य तपासणी करून माती परीक्षण नुसार रासायनिक खताचा संतुलित वापर करावा, नॅनो युरिया व नॅनो डीएपी या पर्यायी खतांचा वापर करावा,खतांच्या असंतुलित वापराचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याविषयीही माहिती दिली….

सदरील ग्राम सभेस सरपंच (प्रशासक) भगवानराव राखुंडे, मा पंचायत समिती सभापती रईस बागवान, पोलीस पाटील इलियाज बागवान, ग्रामविकास अधिकारी के के कल्याणकर, मा. प. स. स. रईस बागवान,सहाय्यक कृषि अधिकारी एस डी पालवे, व शेतकरी उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!