केज/प्रतिनिधी
भारत सरकारच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत सन २०२६ च्या जनगणनेसाठी ‘स्व-गणना’ (Self Enumeration) सुविधेचा प्रारंभ झाला आहे.दि.१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने स्वतः भरता येणार आहे. या प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन तहसीलदार श्री.अशोक भंडारे यांनी केले आहे.
काय आहे स्व-गणना प्रक्रिया?
जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि अचूक करण्यासाठी सरकारने डिजिटल माध्यमाचा वापर केला आहे.यात नागरिक प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वीच आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती अधिकृत पोर्टल वर भरू शकतात.यामुळे वेळेची बचत होऊन अचूक माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे.
माहिती भरण्यासाठीच्या स्टेप्स
१.लॉग-इन अधिकृत वेबसाईट https://se.census.gov.in वर जाऊन राज्याची निवड करावी.
२.नोंदणी- कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंदवून OTP द्वारे पडताळणी करावी.
३स्थान निश्चिती- जिल्हा, तालुका,गाव आणि नकाशावर आपल्या घराचे अचूक लोकेशन मार्क करावे.
४.प्रश्नावली- कुटुंबातील सर्व सदस्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी.
५अंतिम सबमिट
माहिती पुन्हा एकदा तपासून ‘Final Submit’ बटण दाबावे. एकदा माहिती सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी भरलेली माहिती गोपनीय ठेवली जाते.स्व-गणना केल्यानंतर प्रगणक (Enumerator) केवळ या माहितीच्या पडताळणीसाठी आपल्या घरी भेट देतील. तरी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी.
-श्री.अशोक भंडारे तहसीलदार
महत्त्वाची टीप
स्व-गणना करण्याची सुविधा केवळ १५ मे २०२६ पर्यंत उपलब्ध आहे.ज्या नागरिकांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य नाही,त्यांच्या घरी प्रगणक येऊन नेहमीच्या पद्धतीने माहिती संकलित करतीलच, मात्र सुजाण नागरिकांनी डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा,अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.











