पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव येथील रस्त्याची दुरवस्था


जालना . प्रतीनिधी, (रामकिसन अवधूत) :

अंबड तालुक्यातील घुंगर्डे येथील समृद्धी कारखाना ऑफिस ते तीर्थपुरी फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाले असून , हा मुख्य रस्ता अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. शाळकरी मुलांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे नागरिकासाठी मोठी अडचण येत आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलामुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. घुंगर्डे हादगाव गावातुन तीर्थपुरी फाटा ते समृद्धी ऑफिस हा मुख्य रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. वारंवार गुत्तेदार व वरिष्ठ अधिकारी यांना तक्रारी व निवेदन देऊनही ठोस उपाययोजना झालेली नाही. या रस्त्याचा सर्वात जास्त फटका शाळकरी मुलांना बसत आहे. रस्त्यावरून चालताना अनेक विद्यार्थी चिखलात पडत आहे. तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही फटका बसत आहे. लहान मुले शाळा जाताना चिखलात पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी अंधारात वाहन चालविणे धोकादायक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. घुंगर्डे हादगाव सह परिसरातील नागरिकांनी गुत्तेदार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सरपंचसह ग्रामस्थांनी केली आहे. तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!