पोलिस प्रशासन न्यूज.

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात स्व.आश्रुबा दादा गायकवाड पुण्यातिथी निमित्त गाथावाचन,ग्रामगीता वाचन,रंगभरण स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा संपन्न.


केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २० व्या शतकातील महान विभुती आश्रुबा दादा गायकवाड यांची पुण्यतिथी गाथावाचन, ग्रामगीता वाचन, रंगभरण स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा घेवून साजरी करण्यात आली.

सकाळी ११ ते ४ या वेळात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.अध्यक्षस्थानी दोन्ही संस्थेचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक,महाराष्ट्रा तील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.गाथावाचन ह.भ.प.नारायणभाऊ गायकवाड,रविंद्र गायकवाड यांनी केले. ग्रामगीता वाचन माजी सरपंच रामराजे गायकवाड,दादासाहेब गायकवाड,एस.के.वैरागे यांनी केले.२० व्या शतकातील महानविभुती निस्पृह वृत्ती,निरपेक्ष, निस्वार्थ भावनेतून संत आश्रुबा दादा गायकवाड यांनी अध्यात्मिक क्षेत्रात किर्तन सेवा,प्रवचन सेवा, अध्यात्मिक ग्रंथवाचन, अध्यात्मिक ग्रंथांचा अर्थ सांगणे संपूर्ण महाराष्ट्रात अध्यात्मक्षेत्रात आयुष्य खर्च केले.महिला भजनी परंपरा आनंदगांव येथे सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रभर पोंहचविण्याचे महान कार्यही दादांनी केले.

२० शतकात वहानाची सोय नव्हती,तरीही स्वतः च्या बैलगाडीतून आपल्या शेतातील कडबा गाडीत टाकून संपूर्ण महाराष्ट्रभर किर्तन सेवा व प्रवचन सेवा केली.काम,क्रोध,मद, मत्सर,दंभ,अहंकार या षडगुणांचा त्यांनी त्याग केला म्हणूनच ते संपूर्ण महाराष्ट्रभर दादा महाराज म्हणून प्रसिद्ध होते.असे प्रतिपादन ह.भ.प.नारायण भाऊ गायकवाड मनोगत व्यक्त केले.इतर मान्यवरांनीही मनोगतात आश्रुबा दादा गायकवाड यांच्या कार्याला ऊजाळा दिला.

रंगभरण व काव्यवाचन स्पर्धेतही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिक्षक म्हणून रविन्द्र गायकवाड व एस.के. वैरागे यांनी काम पाहिले.

काव्यवाचन स्पर्धेत आनंद गायकवाड – प्रथम,वेदिका गायकवाड – द्वितीय,ज्ञानेश्वरी पुंड – तृतीय वर अजिंक्य तट व विक्रम गायकवाड हे उत्तेजनार्थ विजेते ठरले.

रंगभरण स्पर्धेत शिवानी भगत – प्रथम,प्रणाली पुंड – द्वितीय,अजिंक्य तट -तृतीय,समर्थ गायकवाड – उत्तेजनार्थ विजयी ठरले.बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ज्ञानेश्वर गडदे गडदेवाडी अंबाजोगाई,कळंबचे ग्रंथपाल प्रशांत गायकवाड,कुंडलीक गायकवाड,रविंद्र गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्रा सह बक्षीस वितरण करण्यात आले.

बक्षीस वितरण प्रसंगी मनोगत व्यक्त करताना स्वानंद सार्वजनिक वाचनालय,महाराष्ट्राच्या ग्रंथालय चळवळीचे केंद्र असल्याचे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश्वर गडदे यांनी केले. तर स्वानंद सार्वजनिक वाचनालय हे संस्कारकेंद्र असल्याचे प्रतिपादन कळंबचे ग्रंथपाल प्रशांत गायकवाड यांनी केले.

शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन,बाळासाहेब गायकवाड यांनी केले, तर आभार आनंद भैय्या गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला वाचक, विद्यार्थी,युवक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!