पोलिस प्रशासन न्यूज.

​जि.प. शाळा कुंबेफळ येथे आद्य शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी


मुख्याध्यापक राजाभाऊ कदम यांनी फातिमा शेख यांच्या शैक्षणिक क्रांतीवर टाकला प्रकाश

​केज | प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ (केंद्र: केज मुलांची) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम होते. त्यांनी फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

​शिक्षणाचे महत्त्व दारोदार पोहोचवले

​यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजाभाऊ कदम म्हणाले की, “फातिमा शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी पुणे येथे झाला. ज्या काळात समाजाचा शिक्षणाला मोठा विरोध होता, अशा कठीण परिस्थितीत त्यांनी फुले दांपत्याला साथ दिली. त्यांनी केवळ शाळा सुरू करण्यासाठी जागाच दिली नाही, तर दारोदार जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. १८५१ च्या शाळा स्थापनेत त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अशा थोर समाजसुधारिकेचा आदर्श आजच्या पिढीने समोर ठेवणे गरजेचे आहे.”

​मान्यवरांची उपस्थिती

​या प्रसंगी शाळेतील शिक्षक डॉ. रामकिशन मुळे, श्री. संदीप ठोंबरे, श्री. आकाश लोंढे, श्री. राहुल बचुटे, श्री. आबासाहेब धपाटे, श्रीमती निलावती भोरे मॅडम आणि श्रीमती अंजली उटीकर मॅडम यांनीही फातिमा शेख यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन करून त्यांना आदरांजली वाहिली.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आकाश दत्तात्रय लोंढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. संदीप मेघराज ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!