पोलिस प्रशासन न्यूज.

अनुष्का प्रकरणातील अन्यायाविरोधात केज येथे रास्तारोको आंदोलन,मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे रोहित कसबे यांचे आवाहन


केज/प्रतिनिधी : अनुष्का प्रकरणातील अन्याय,प्रशासनाची असंवेदनशील भूमिका आणि समाजाच्या लेकीला न्याय मिळावा या मागणीसाठी केज येथे आज सोमवारी दि.१२ जानेवारी २०२६ रोजी रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “उठ दलीता जागा हो,संघर्षाचा धागा हो” या घोषणेखाली होणाऱ्या या आंदोलनातून पुन्हा कोणतीही अनुष्का बळी जाऊ नये,असा ठाम संदेश देण्यात येणार आहे.

अनुष्कावर झालेल्या अन्यायानंतर प्रशासनाने दाखवलेली उदासीनता ही केवळ कायद्याचीच नव्हे तर माणुसकीचीही अवहेलना असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.हा लढा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून,तो समाजाच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायाच्या हक्कासाठी आहे,असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

सामाजिक भान ठेवून नागरिकांनी एक दिवसाचे काम बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. शांततामय मार्गाने रास्तारोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून,दोषींवर कठोर कारवाई,पीडित कुटुंबाला न्याय तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.

आंदोलनाचा तपशील

ठिकाण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक,केज,तालुका -केज, जिल्हा बीड,वार सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ वेळ सकाळी ठीक ११ वाजता या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, दलित संघटना,युवक, विद्यार्थी व महिलांचा पाठिंबा मिळत असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!