पोलिस प्रशासन न्यूज.

येवता येथे श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


केज/येवता:

तालुक्यातील येवता (सोनवणे वस्ती) येथे श्री संत भगवान बाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आणि मंदिर वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य ‘त्रैदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २ जानेवारी ते रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ या कालावधीत हा आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे.

​सप्ताहाचे मुख्य कार्यक्रम

​या तीन दिवसीय सोहळ्यात नामवंत कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे:

​शुक्रवार, २ जानेवारी: सायंकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत ह.भ.प. अनिल महाराज कासकर (बंकटस्वामी संस्थान, नेकनूर) यांचे कीर्तन होईल.

​शनिवार, ३ जानेवारी: सायंकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत ह.भ.प. गणेश महाराज बांगर (बांगरवाडा ता. पाटोदा) यांचे कीर्तन होईल.

​रविवार, ४ जानेवारी (सांगता): सकाळी १२ वाजता ह.भ.प. लक्ष्मण महाराज इनामदार गुरुजी (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, येवता) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.

​प्रमुख उपस्थिती व नियोजन

​या सोहळ्याचे नियोजन ह.भ.प. श्री मधुकर महाराज इनामदार (येवता) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. राजेशसाहेब (पापा) देशमुख, मा.श्री. भगवानराव केदार, मा.श्री. विष्णु (भाऊ) घुले, मा.श्री. विजयकांत (भैय्या) मुंडे आणि मा.श्री. विलास (अप्पा) जोगदंड,सरपंच.येवता. यांसह परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​भाविकांना आवाहन

​सोनवणे/गवळी परिवार व समस्त येवता ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलमयी पर्वावर परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

​स्थळ: श्री संत भगवान बाबा मंदिर, सोनवणे वस्ती, येवता, ता. केज, जि. बीड.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!