पोलिस प्रशासन न्यूज.

बीडच्या नागसेन बुद्धविहारात वर्षावास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्न ; भदंत धम्मशील थेरो यांचे धम्मप्रसाराचे आवाहन


                                                                     बीड:शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नागसेन बुद्धविहार, धानोरारोड, बीड येथे वर्षावास २०२५ चा समापन समारोप सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला पुज्य भदंत धम्मशील थेरो आणि भदंत धम्मबोधी (महाविहार, शिवणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुरुवातीला कृषी कॉलनी ते नागसेन बुद्धविहार अशी भंतेजींची सवाद्य रॅली काढण्यात आली, यावेळी उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. विहारात भंते धम्मशील थेरो यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला: बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परमेश्वर बनकर यांनी मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेल्या अधिकारांची आठवण करून दिली. भदंत धम्मबोधी यांनी बुद्ध धम्म आणि वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट केले.          भदंत धम्मशील थेरो यांनी आपल्या प्रमुख भाषणात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा बुद्ध धम्म देऊन उपकृत केले आहे, असे सांगितले. त्यांनी सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेल्या तक्षशिला आणि नालंदासारख्या जागतिक विद्यापीठांचा उल्लेख केला.  थेरो यांनी देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सरन्यायाधीशांसारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा अपमान करण्याचे प्रकार किंवा राष्ट्रपतींना मंदिर प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत असल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी बौद्धांना आवाहन केले की, प्रत्येक रविवारी सहकुटुंब विहारात यावे आणि मनाला सुख, शांती, समाधान देणाऱ्या धम्माचे तत्व अंगीकारून आपले जीवन समृद्ध करावे. तसेच, बुद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराची चळवळ गतिमान करण्यासाठी आपले योगदान द्यावे.      केशरताई त्रिंबकराव कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी शरणत्रय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!