गेवराई(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा बीड व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघटना यांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहमान साहेब यांच्या कडे सतत चा पाठपुरावा करून निवेदने देऊन व तोंडी चर्चा घडून आणल्या व विविध अडचणीवर मात करीत त्यांना आज दिनांक 10.10.2025 रोजी 8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली यात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाला / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना यश प्राप्त झाले आहे व समुपदेशनाने पदोन्नती मिळाल्याबद्दल कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे आभार मानले असे उबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांची कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी जाण तळमळ आपुलकी पाहून सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, मा.उप.मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद बीड यांचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राज्य संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे,सचिव नंदकिशोर परळकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक चव्हाण, स्था.राज्य उपाध्यक्ष ओंकार उबाळे,अध्यक्ष सचिन तांदळे,सचिव रूपेश कोकिळ,कार्याध्यक्ष डॉ.संभाजी जाधव,शिवलाल राठोड,कोषाध्यक्ष उमेश हूलजुते,सहसचिव प्रदीप बनकर,संघटक विलास बहिरवाळ,कार्याध्यक्ष उत्तरेश्वर आंधळे,आरोग्य अध्यक्ष आशाताई धुतमल,आरोग्य अध्यक्ष भरत नागरगोजे,चतुर्थ श्रेणी अध्यक्ष परमेश्वर पवार, इत्यादींनी जाहीर आभार मानले.













