पोलिस प्रशासन न्यूज.

केज तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाची सुरुवात, एकाच दिवशी नागरिकांना महसुली सेवा मिळणार


केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना महसुली सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र.१) राबविण्यात येत असून, या अंतर्गत केज तालुका येथे विविध गावांमध्ये विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरांमधून नागरिकांना एकाच दिवशी (Single Day Service Delivery) अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.शिबिरांचे वेळापत्रक सकाळी ११.०० वाजता

होळ –७ मार्च २०२६,

युसुफ वडगाव –१४ मार्च २०२६,चिंचोली माळी – १५ मार्च २०२६

मस्साजोग –१० एप्रिल २०२६,हनुमंत पिंपरी – १७ एप्रिल २०२६,

बनसारोळा –१८ एप्रिल २०२६,नांदुरघाट – ७ मे २०२६,विडा – ८ मे २०२६,केज –१५ मे २०२६या शिबिरांमध्ये उपलब्ध प्रमुख सेवा पुढील प्रमाणे आहेत

रस्ते विषयक तक्रारींचे निवारण,जिवंत ७/१२ मोहीम,संगायो/श्रावणबाळ योजनांचे अर्ज व हयात प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखले,अॕग्री स्टॕक योजना ,मंजूर फेरफार प्रकरणांतील ७/१२ व उतारे वाटप, ७/१२ दुरुस्ती अर्ज,डिजिटल ७/१२ कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती, भोगवटदार वर्ग २ ते वर्ग १ रूपांतरण मार्गदर्शन, तुकडेबंदी कायद्यानुसार नियमितीकरण,अकृषक (NA) मार्गदर्शन,रेशन कार्ड विषयक अर्ज, जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र अर्ज,नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई इ केवायसी,लक्ष्मी मुक्ती योजना,नवीन मतदार नोंदणी,ई-मोजणी (प्रॉपर्टी कार्ड/वारस नोंदी/नकाशे),पी एम किसान (लँड/आधार सिडिंग, ईकेवायसी), आभा कार्ड व लाडकी बहीण योजना इ केवायसी तसेच इतर सर्व प्रशासकीय अर्ज स्वीकारले जाणार आहेत तरी गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राकेश गिड्डे यांनी केज तालुक्यातील सर्व ग्रामस्थ,शेतकरी,विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरस्थळी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.या अभियाना च्या यशस्वी अंमल बजावणीसाठी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

शासन सेवा,आता आपल्या दारी येत आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!