बीड.प्रतिनिधी: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय (कमांडर इन चीफ ) आद. डॉ. भीमराव य.आंबेडकर साहेब यांची वडवणी येथे होणाऱ्या पाचव्या धम्मपरिषदेला जातांना रमाई काॅंप्लेक्स, जिजामाता चौक, कुक्कडगाव येथे तोफांच्या सलामीत समता सैनिक दलाच्या मानवंदनेत सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले संरक्षण उपाध्यक्ष जील्हा बीड, अमरसिंह ढाका संरक्षण सचिव महाराष्ट्र राज्य तथा कोषाध्यक्ष बीड जिल्हा, डिव्हीजन आफिसर सिध्दार्थ जगझाप बीड जिल्हा सरचिटणीस, कंपनी कमांडर सुजाताताई वासनिक, आयु. मंदाताई मस्के महिला तालुका अध्यक्षा, नंदाताई भंडारे, शोभाताई आठवले, यशवंत कदम, प्रशांत वासनिक व कुक्कडगाव सह खुंड्रस, निपाणी जवळका परिसरातील समता सैनिक व बौद्ध उपासक उपासिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमच कुक्कडगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांची भेट अचानक लाभली कुक्कडगाव त्यांच्या पदकमलाने पावण झाले. निश्चितच कुक्कडगाव हे कुशलकर्मी गाव आहे. उपस्थित सर्व कुक्कडगाव मधील समता सैनिक दल महिला व बंधू यांचे अभिनंदन. या भेटीच्या नियोजननासाठी अक्षय रा. आठवले, मयूर कदम, अजय(दादू) आठवले, भास्कर तात्या आठवले व नितीन आठवले यांनी परिश्रम घेतले.












