पोलिस प्रशासन न्यूज.

ॲड. प्रकाश आंबेडकरांची भाजप-आरएसएसवर सडकून टीका!


अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाने जनसागर उसळला. त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘टाटा, बाय बाय’ करून देशाला वाचवण्याचे आवाहन केले. तसेच, ओबीसी (OBC) समाजाने आरक्षणाबाबत वेळीच सावध होण्याचा इशारा दिला.ॲड. आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप-आरएसएसवर टीका करताना, “ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला आहे. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल,” असे म्हटले. स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता आहे. केवळ राजकीयच नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा धोक्यात येणार असल्याने ओबीसींनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, स्वतःला ‘विश्वगुरु’ म्हणणारे मोदी देशाच्या संकटात भर घालत आहेत. जगभरात भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जगभरातील सुमारे २० कोटी भारतीय देशात परत आल्यास इथल्या व्यवस्थेवर मोठा ताण पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.परदेशात मोदींना मिळणाऱ्या वागणुकीचे व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत, इतका अपमान जगभरातील देश करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एकही मित्र देश बाजूला राहिला नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांवरही टीका केली. पाकिस्तानला बाहेरून युद्ध सामग्री मिळत असल्याने भारताचे सैन्य लढणार कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.”ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोदीला टाटा, बाय बाय करा. त्याचं आणि जगाचं भांडण आहे, ते भारतीयाचं नाही,” असे स्पष्टपणे सांगत, मोदींनी आपला ‘इगो’ (Ego) बाजूला ठेवून देशाला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

​अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!