पोलिस प्रशासन न्यूज.

*मलकापूरच्या पोलिस पाटलांवर प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून खुलासा सादर करण्याचे आदेश*


*गावात गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करून सेवेतून बडतर्फे करावे— भागवत गित्ते*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे मलकापूर येथील पांदण रस्त्याच्या वादातून आता प्रशासन विरुद्ध पोलिस पाटील असा नवा वाद निर्माण झाला असून, तहसील प्रशासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप संबंधित पोलिस पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत गावातील भगवत रामकिशन गित्ते यांनी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

निवेदना म्हटले होते की,मलकापूर येथील पांदण रस्त्याच्या पाहणीसाठी तहसील प्रशासनाचे पथक गावात आले असताना संबंधित पोलिस पाटील यांनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “ही जागा नसून दुसरीकडे आहे” असे सांगत मोबाईलमधील चुकीचे ठिकाण दाखवून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याची तक्रारी अर्जात करण्यात आला आहे. तसेच गावातील एका गटाची बाजू घेत शेतकरी बांधवांमध्ये वाद निर्माण होईल, असे वातावरण तयार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत नकाशे व कागदपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून वस्तुस्थिती तपासली असल्याचे अर्जदारांनी म्हटले आहे. पोलिस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त असताना त्यांनी पक्षपाती भूमिका घेत प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, परळी वैजनाथ यांनी संबंधित पोलिस पाटील मलकापूर यांना नोटीस बजावली आहे. दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी १२ वाजता कार्यालयात उपस्थित राहून या प्रकरणी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या कामात कोणताही विलंब करू नये, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यावर कारवाई करून सेवेतून कमी करावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई विलंब झाल्यास जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांची भेट घेणार असल्याचेहि भागवत गित्ते यांनी सांगितले.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!