(खेमाडे वस्ती आहेर धानोरा बीड येथे भीमजयंती व बुद्ध जयंती उत्साहात संपन्न.)
बीड ( प्रतिनिधी) 04 मे 2026 रोजी नियोजित जागा कपिल वस्तू बुद्ध विहार खेमाडे वस्ती आहेर धानोरा तालुका जिल्हा बीड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती व तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती शिवनी येथील 40 श्रामनेर भिकू व अनागारिका संघ यांच्या सुवाद्य धम्म रॅली काढून पूज्य भंते धम्मशील थेरो यांच्या हस्ते व सरपंच बालासाहेब आबा इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नियोजित जागा कपिल वस्तू बुद्ध विहार येथे करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील घेतले व पूज्य भंतेजींनी धम्मदेशना देऊन धम्माचे महत्त्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणा बद्दल दिलेला मोलाचा उपदेश समजावून सांगितला.
भंते धम्मशील थेरो यांनी आपल्या मंत्रमुग्ध धम्मदेसनेत तथागतांच्या जीवनातील वैशाख पौर्णिमेचे महत्त्व सांगताना म्हणाले की सिद्धार्थांचा जन्म ज्ञानप्राप्ती व तथागतांचे महापरिनिर्वाण याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले. ह्या प्रसंगाबद्दल सखोल विवेचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशाला खेमाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश खेमाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली खेमाडे, सारिका ,खेमाडे, छाया खेमाडे, राहुल खेमाडे, सुधाकर खेमाडे यांनी बहुमोल परिश्रम घेतले.
याप्रसंगी आहेर धानोरा येथील आर जे इंगोले, सतीश घोलप, सरपंच पालवन मनोज पवार, गणेश उगले, विनोद इंगोले व डॉ.अमरेंद्र विद्यागर कॅप्टन राजाभाऊ आठवले रवी वाघमारे ॲड राजेश शिंदे, ॲड तेजस वडमारे, डी. जी. वानखेडे ,प्रेम कांबळे,यशवंत कदम, आदित्य जोगदंड भास्कर सरपते, संपत खेमाडे,कालिदास खेमाडे, राजेंद्र खेमाडे, सुनील खेमाडे, गौतम खेमाडे,आदित्य खेमाडे,आबा खेमाडे, सरिता खेमाडे अंजली वडमारे, मीना खेमाडे साळुबाई खेमाडे ,मीरा खेमाडे, बापू खेमाडे ,दीपक खेमाडे गोटू खेमाडे ,आरती खेमाडे ,नकुल खेमाडे कावेरी खेमाडे, सुनिता खेमाडे, रेखा खेमाडे, सुरेखा खेमाडे ,पुष्पा मगर ,अश्विनी खेमाडे, वसंत खेमाडे ,रूपाली खेमाडे, लीलावती खेमाडे भीमराव खेमाडे ,कस्तुरबाई खेमाडे ,आसराबाई खेमाडे ,वेदिका खेमाडे,आम्रपाली मगर जानवी मगर, वैदही खेमाडे अमृता मगर व परिसरातील बहुसंख्य बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली. जयंती उत्सव समितीतर्फे खीरदान व भोजनदान देण्यात आले.














